नमस्कार

मी चौथीप्रसाद गुप्ता. मी उत्तर मुंबई काँग्रेस च्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचे प्रतिनिधित्व करतो. जनतेच्या सेवेसाठी जननी मानव सेवा संस्थेची निर्मिती केली. ज्याद्वारे मी सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आलो आहे. त्याचप्रमाणे त्या त्या विभागाच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधींना भेटणे, विभागाच्या समस्यांबाबत त्या विभागातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे, आंदोलनात सहभागी होणे, न्यायालयापासून ते सरकारी कर्मचार्यांपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचे काम करत आलो आहे.

pic

कार्यक्षेत्र

- शिक्षण


- वैद्यकीय मदत


- महिला सक्षमीकरण


- समाजकार्य


pic

दूरदृष्टि

लोकांना त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या सरकारी सुविधेबद्दल जागरूक करणे


सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेद्वारे मुलींना शिक्षण घ्याण्यास मदत करणे

समाजाला साक्षर करून त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी मदत करणे

आमचे ध्येय आहे एक असे जग निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करणे जिथे प्रत्येक व्यक्तीला, त्यांचे वय, रंग, वंश, धर्म, मूळ किंवा आर्थिक क्षमता याची पर्वा न करता, त्यांना चांगले जीवन जगता येईल, चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील, मुलांना चांगले शिक्षण मिळेल.।

स्वच्छता मोहीम राबवून आपला देश सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करणे


महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे

लक्ष्य

अधिकाधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे


मुलांना सहज चांगले शिक्षण मिळावे याकडे लक्ष देणे

महिलांना रोजगारासाठी मदत करणे।


महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी योजना तयार करणे


pic

जीवनचरित्र

माझा जन्म १९७० साली केतकीपाडा येथे झाला. माझे वडील स्वर्गीय शोभनाथ गुप्ता हे मिलमध्ये काम करायचे, आणि आई गृहिणी होती.

मला 3 मोठ्या बहिणी आणि 1 लहान भाऊ आहे.

गरीब घरात जन्माला आल्याने त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.अनेक वेळा घरात खायला आणि घालायला कपडे नव्हते. माझे शिक्षणही जवळच्या महापालिकेच्या शाळेत केले. एक वेळ अशी आली की 1985 मध्ये वडिलांना अर्धांगवायू झाला, त्यानंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी शिक्षण अर्धवट ठेवून लहानमोठ्या नोकऱ्या करून कुटुंबाचा खर्च भागवावा लागला. मला पुढे शिकता आले नाही, परंतु ज्या मुलांना शिकायची इच्छा आहे त्यांच्या मदतीसाठी मदतीसाठी जननी मानव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आस पासच्या मित्रांसह मोफत शिकवणी चालवून मुलांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आणि आजही गरजू मुलांना वही, पुस्तक,पेन्सिल दिल्या जातात. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात

अशाच प्रकारे विभागातील समस्यांबाबत त्या विभाग लोकप्रतिनिधींच्या भेटी घेणे, विभागाच्या समस्यांबाबत विभागातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे, सत्याग्रहात सहभागी होणे, न्यायालय दरबारी ते सरकारी कर्मचार्यांपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचे काम करत आलो आहे |

परंतु जेव्हा आपण लोकांच्या गरजेची कामे करतो तेव्हा आपल्याला कोणतेतरी व्यासपीठ हवे असते किंवा सत्तेत बसलेले लोकप्रतिनिधी आणि पक्षाची गरज असते, याच क्रमाने 1999 मध्ये युवक काँग्रेसच्या प्रभागात अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र मिळाले आणि अथक प्रयन्तांनी त्या विभागात कार्यकर्त्यांची फौज तयार करून, विभागात कार्यक्रम करून, लोकांना जोडून, ​​ लोकांची कामे करून, अशा प्रकारे मी लोकांच्या सेवेत रमलो. 2002 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यानंतर ब्लॉक सचिव, उत्तर मुंबई जिल्हा सचिव, काँग्रेस ट्रेड युनियन मुंबईचे अध्यक्ष अशी भूमिका बजावली.

दहिसर बोरिवलीचे मागाठाणे आणि उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांचा सर्वतोपरी प्रचार केला आणि त्यांचा आवाज घरोघरी पोहोचवण्यास मदत केली.

सन २०१२ मध्ये संस्थेची स्थापना झाली. 'जननी मानव सेवा ट्रस्ट' ज्यामध्ये विभागातील सर्व सदस्य, मग ते कार्यकर्ते असोत किंवा कोणत्याही जाती-धर्माचे, राजकीय पक्षाचे प्रमुख असोत, सर्वांना आपला फायदा होऊ शकतो, आपण लोकांची सेवा करू शकतो, लोक आपल्याला न डगमगता भेटू शकतात, आमच्या पर्यंत पोहोचू शकतात ह्या उद्देशाने या ट्रस्टची पायाभरणी करण्यात आली. जननी मानव सेवा ट्रस्ट, च्या अंतर्गत सर्व मुले-मुली, महिला व पुरुष यांना मोफत संगणक शिकवणे, गरजू विधवा महिलांना धान्य वाटप करणे, शाळकरी मुलांना वेळोवेळी पुस्तके देणे, वैद्यकीय सुविधा देणे अशी कामे केली जातात.

जननी मानव सेवा ट्रस्टमध्ये, आमचा विश्वास आहे की जर सर्वोत्तम दान असेल तर ते रक्तदान आहे. ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोन वेळा मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते ज्यामध्ये स्थानिक लोकही या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आपले सहकार्य देतात. मुंबईत जेव्हा जेव्हा गरज भासली आहे तेव्हा संस्थेचे लोक पुढे येतात आणि शिबिराचे आयोजन करतात.

जननी मानव सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅन्सरग्रस्तांना मदत केली आहे, मोतीबिंदूग्रस्तांचे मोफत ऑपरेशन केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहिललो आहोत. 'जेव्हा तुम्ही स्त्रीला स्वावलंबी बनवाल तेव्हा तुम्ही देशाला स्वावलंबी बनवत जाल' असे माझे मत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी दहिसरमध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात, ज्यामध्ये महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये शिवणकाम, ब्युटीशियन कोर्स, केक बनवणे इत्यादी शिकवले जातात. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांना सरकारी धोरणांद्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज मिळवून देण्यास मदत करतो. यासोबतच ६०० हून अधिक महिलांना शिलाई मशीन आणि टूल किट दिले आहेत.

जननी मानव सेवा ट्रस्ट वेळोवेळी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करते.

त्याअंतर्गत मुंबईतील रिक्षाचालकांना मोफत अपघाती पॉलिसी ही दिले जाते. कोणताही रिक्षाचालक आपले आधार कार्ड, लायसन्स बॅच, लाईट बिल देऊन जननी मानव ट्रस्टचा सदस्य होऊ शकतो आणि रु. 2,00,000 (दोन लाख) च्या मोफत अपघाती योजनेचा लाभ घेऊ शकतो.

संपर्क

संपर्क

जनसंपर्क कार्यालय
1८ हिरल स्पेलण्डर टावर केतकीपाड़ा रोड नियर डायमंड इंडस्ट्रीज दहिसर पूर्व मुंबई 400068